बंद

    दृष्टी आणि ध्येय

    प्रकाशित तारीख : November 14, 2019

    आमचा दृष्टीकोन

    राज्यातील सर्व नागरिकांचे शाश्वत, समावेशी आणि ऊर्जा सुरक्षित भवितव्य घडविण्यासाठी स्पर्धात्मक दरात आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे चोवीस तास विश्वासार्ह वीज पुरवठा उपलब्ध करणे आणि राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचे पारंपरिक ऊर्जा वापरापासून नवीकरण ऊर्जावापरामध्ये परिवर्तन घडविणे.

    आमची वचनबद्धता

    1. शाश्वत आणि सुरक्षित ऊर्जा भवितव्य घडविण्यास आम्ही समर्पित आहोत. पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करतानाच सौर, पवन, जल, वायू आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे वीजनिर्मितीवर भर देऊन राज्याच्या ऊर्जा साधनांमध्ये विविधता आणणे व त्याद्वारे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणि लवचिकता प्राप्त करणे.
    2. महाराष्ट्र राज्यातील कृषी आणि उद्योग क्षेत्राला बळ देतानाच राज्याच्या सर्वंकष आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रास्त आणि स्पर्धात्मक दरात अखंड तसेच दर्जेदार वीज पुरवठा करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
    3. राज्याच्या सर्वंकष आर्थिक विकासासाठी तांत्रिक उत्कृष्टता आणि महिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचे परिवर्तन करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.