बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    उद्दीष्टे

    • ऊर्जा परिवर्तन – स्वच्छ ऊर्जानिर्मिती करणे आणि पर्यावरणावरील आघात कमी करण्यासाठी सौर, पवन, जल, भूऔष्णिक इत्यादी नवीकरणीय ऊर्जा साधनांच्या वापरावर भर देणे.
    • पायाभूत सुविधा विकास – पारेषण जाळे बळकट करणे, वीजगळती कमी करणे आणि आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास भरवशाचा वीज पुरवठा सुनिश्चित करणे.
    • परवडणाऱ्या दरात सर्वांसाठी ऊर्जा – घरांना, उद्योगांना आणि एकूण अर्थव्यवस्थेला किफायतशीर दरात अखंड वीज पुरवठा.
    • शाश्वतता – ऊर्जा कार्यक्षमता, ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अंगिकार.
    • लवचिकता – योग्य नियोजनाद्वारे वीज पुरवठा खंडित होणे किंवा त्यामध्ये व्यत्यय येणे अशा संकटांसाठी तयार राहणे.

    कार्य

    • धोरण आणि नियमन – ऊर्जा धोरणे, प्रमाण निकष आणि सुरक्षा नियम निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करणे.
    • पायाभूत सुविधा व्यवस्थापन – ऊर्जा निर्मिती केंद्रे, पारेषण जाळे आणि वितरण प्रणाली विकसित करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे तसेच त्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे.
    • जनसहयोग – विजेच्या बाबतीत कार्यक्षमता, संवर्धन आणि सुरक्षितता याविषयी ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणे.
    • नवोन्मेष (Innovation) – नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा संचय आणि स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकासाला चालना देणे.
    • आपत्ती प्रतिसाद – वीज पुरवठा खंडित झाल्यास लवकरात लवकर तो पुन्हा सुरळीत व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रक्रिया अंमलात आणणे.